(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ आणि जे ए टी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ अन्सारी फर्जना यांनी केले. प्रा. मेश्रामकर सुनेत्रा उपस्थितांचा परिचय करून दिला आणि स्वागत केले. डॉ लोधी कनीझ फातिमा यांनी कार्यशाळेचा हेतू विशद केला. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थिनींना ' *एनहान्स युअर पर्सनॅलिटी*' या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा असे आवाहन केले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात एज्युकेटर एज्युकेशन संस्थेच्या संस्थापक आणि रोटरी क्लब मालेगाव फोर्टच्या उपाध्यक्षा मिसेस शिल्पा राहुल देशमुख यांनी ' *मोटिवेशन* या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी निर्भय बनावे आणि आयुष्यात आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी सदैव झटावे असे आवाहन केले. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात शगुफ्ता ब्युटी क्लिनिकच्या संचालिका मिसेस शाहीन रफअत यांनी *ग्रुमिंग अंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट*' या विषयावर मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकासात स्वच्छ कपडे आणि नीटनेटके राहणीमान याची का आवश्यकता आहे हे स्पष्ट केले. सदर कार्यशाळेत प्रथम आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ फर्जना यांनी केले. प्रा मेश्रामकर सुनेत्रा यांनी आभार मानल्यावर कार्यशाळेची सांगता झाली. डॉ हुमायरा यांनी सहकार्य केले.
जे ए टी महिला महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
0