नाशिक: विभागीय सहनिबंधक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे.
*आरोपी:*
1. भिमराव यशवंत जाधव, वय- 45 वर्षे, व्यवसाय-नोकरी,सहकार अधिकारी, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग,नाशिक पद-वर्ग ३
2. श्री अनिल नथ्थुजी घरडे, वय ५२ वर्षे, व्यवसाय-नोकरी, सहाय्यक सहकार अधिकारी/वरिष्ठ लिपिक विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग,नाशिक पद-वर्ग ३
*लाचेचे प्रकरण:*
तक्रारदार हे को-ऑप क्रेडिट सोसायटी चे क्लार्क असून सोसायटी चे नियमानुसार सभासद यांनी कर्ज भरले नाही म्हणुन सभासद यांचे घर लिलाव विक्रीचा आदेशाविरुद्ध विभागीय सहनिबंधक कार्यालय,नाशिक येथे सभासद यांनी रिव्हिजन दाखल केली असून
सदर प्रकरणाची चौकशी सदर कार्यालयात सुरू होती. सदर कार्यवाहीची निकाल तक्रारदार यांच्या को- ऑप क्रेडिट सोसायटी चे बाजूने देण्यासाठी आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदार कडे 6 लाख रुपयाची मागणी केली तसेच दि.7/12/2023 व दि.8/12/2023 रोजीचा पडताळणी कारवाईत तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 5 लाख रुपये लाचेची मागणी केली.
**कारवाई:**
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार यांच्या तक्रारीची दखल घेऊन सापळा रचला. दोन्ही आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7 , 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
**लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:**
या प्रकरणाच्या माध्यमातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
**दुरध्वनी क्रमांक:**
02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४
**टीप:**
हे प्रकरण नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करणारे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अशा कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.