📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयाचे रासेयो विशेष शिबिर संपन्न

(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालय, रासेयो विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी शिबिर दत्तक गाव टेहरे येथे संपन्न झाले. सदर शिबिराचे उद्घाटन टेहरे गावच्या सरपंच सौ कविता पाटील यांच्या शुभहस्ते झाले. शिबिराचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान आणि शैक्षणिक समन्वयक सलमा अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर शिबिरात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले यामध्ये प्रामुख्याने ग्राम स्वच्छता, मतदार जागृती अभियान, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, बेटी बचावो बेटी पढाओ जनजागृती, पाणी वाचवा अभियान, अन्नसुरक्षा, एड्स जागरूकता इत्यादी उपक्रमांचा समावेश होता. सदर उपक्रम पार पाडण्यासाठी रासेयो प्रमुख प्रा अबुलेस निहाल अहमद, डॉ हुमायरा, प्रा. मेश्रामकर सुनेत्रा यांचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व उपक्रम विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे राबविले. ग्रामस्थांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि विद्यार्थिनींचे कौतुक केले. विद्यार्थिनींनी गावकऱ्यांशी सुसंवाद साधून मतदार जागृती केली. बेटी बचावो बेटी पढाओ रॅली द्वारे जनजागृती केली. वृक्षदिंडी द्वारे वृक्ष वाचवा अभियान राबवले आणि ग्रामस्थांना रोपांचे वाटप केले. सदर शिबिरात अनेक मान्यवरांनी आपल्या व्याख्याना द्वारे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले यात प्रामुख्याने टेहरे गावचे उपसरपंच श्री श्रीकांत शेवाळे (समाजसेवा), सौ. चित्रा सोनवणे आणि श्री अमित साळवे (एड्स जनजागृती), सौ. मनीषा अहिरे वेलनेस कोच (अन्नसुरक्षा), सौ विजयालक्ष्मी अहिरे (लिंगभेद एक सामाजिक समस्या), एडवोकेट नियाझ अहमद लोधी (मतदार जागृती- काळाची गरज) या मान्यवरांचा समावेश होता. सदर शिबिरास रासेयो क्षेत्र समन्वयक श्री एन. पी. अहिरे यांनी भेट देऊन विद्यार्थिनींच्या उस्फूर्त सहभागाबद्दल कौतुक केले. सदर सात दिवसीय शिबिरांत फॅन्सी ड्रेस, अंताक्षरी, वन मिनिट शो, मेहंदी, इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला आणि सुप्त कलागुणांना प्रगट केले. शिबिराच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ अन्सारी मोहम्मद हारून यांनी शिबिरार्थींचे चे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. शैक्षणिक समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रा मेश्रामकर सुनेत्रा यांनी शिबिराचा अहवाल सादर केला. प्रा अन्सारी अबुलेस निहाल अहमद यांनी शिबिरात शिकलेल्या गोष्टींचे आणि शिस्तीचे पालन आपल्या पुढील आयुष्यात देखील करावे असे आवाहन केले. डॉ हुमायरा यांनी देखील विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा विनोद कुमार पवार, श्री विठ्ठल राऊत, श्रीमती जुबैदा अन्सारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने