नाशिक : ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
नाशिक, दि. 29 डिसेंबर 2023 : जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सही करण्यासाठी सरपंच आणि उपसरपंचाने 30,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही माहिती अँन्टी करप्शन ब्युरोला दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने 30,000 रुपये लाच देण्यासाठी दिल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांना रंगेहाथ पकडण्यात आले.
याप्रकरणी अँन्टी करप्शन ब्युरोच्या सापळा पथकाने भास्कर पुंडलिक गांगुर्डे (वय 55), सरपंच, सोग्रस, रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा नाशिक आणि प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (वय 45), उपसरपंच- सोग्रस,रा. सोग्रस, तालुका- चांदवड, जिल्हा- नाशिक यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी महाराष्ट्र भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी आणि सहकार्य पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक, पो.ना. दिपक पवार आणि पो.शि. संजय ठाकरे यांचा सहभाग होता.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*