📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

३७८ किलो गांजा सह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त; नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

नाशिक जिल्ह्यात अवैध गांजाची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २५/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयीत इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून, नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोव्हा वाहन क. एम.एच.२०.सी.यु.७०७० थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले. सदर वाहनाचा पोलीस पथकाने पाठलाग केला, परंतु ते मिळून आले नाही.

पोलीसांनी नाशिक बाजूकडे जाणारे मार्गावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करून सदर वाहनाचा शोध घेतला असता, नाशिक शहरातील आर.टी.ओ. ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ सदर वाहन बेवारस स्थितीत मिळून आले. सदर वाहनाची झडती घेतली असता, त्यात १२ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या एकूण १८९ पाकीटांमध्ये सुमारे ३७,८३,२५०/- रूपये किंमतीचा ३७८ किलो ३२५ ग्रॅम गांजा मिळून आला.

सदर कारवाईत इनोव्हा वाहन क. एम.एच.२०.सी.यु.७०७० यासह त्यात मिळून आलेला उग्र वासाचा गांजा असा एकूण ६२,९०,२५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी इनोव्हा वाहनाचा वापरकर्ता व मालक यांच्याविरूध्द सायखेडा पोलीस ठाणे येथे गुननं २७०/२०२३, एन.डी.पी.एस. अधिनियम १९८५ चे कलम ८, (क) २० (ब) खंड २ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपींचा विशेष पोलीस पथक कसोशिने शोध घेत असून, गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि श्री. गणेश शिंदे हे करीत आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, सपोउनि दिपक आहिरे, शांताराम नाठे, पोहवा सचिन धारणकर, चेतन संवत्सरकर, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल, चापोना जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पोलिस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांनी सदर कारवाईचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने