📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदी रविंद्र जाधव

मनपा वृत्तसेवा:- मा.शासनाचे नगरविकास विभागाकडिल दिनांक १३ डिसेंबर, २०२३ रोजीचा शासन आदेशान्वये मालेगाव महानगरपालिकेत आयुक्त पदावर रविंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने उक्त आदेशानुसार आज दिनांक १४ डिसेंबर,२०२३ रोजी रविंद्र जाधव यांनी मालेगाव महानगरपालिकेत आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला. यापुर्वी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, कोकण या ठिकाणी उपायुक्त पदाची सेवा बजावलेली आहे. 
 तत्पूर्वी त्यांची सेवा मुख्याधिकारी गट ब म्हणुन १९९३ रोजी सुरू झाली. त्यानंतर त्यांनी गेवराई जि.बीड, शिरुर –घोडनदी, जि.पुणे, शेगाव जि.बुलढाणा, राहुरी जि.अहमदनगर, पंढरपुर जि.सोलापुर, चाळिसगाव जि.जळगाव यासारख्या वर्ग अ नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी म्हणुन सेवा बजावलेली आहे. त्यानंतर त्यांनी धुळे महानगरपालिकेत उपायुक्त पदावर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हाधिकारी कार्यालय येथे सह आयुक्त नगरपरिषद शाखा, या ठिकाणी कामकाज केलेले आहे.
 या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त नुतन खाडे, उपायुक्त राजेंद्र फातले, सुहास जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहर अभियंता कैलास बच्छाव, सहा.आयुक्त अनिल पारखे, सचिन महाले, हरिश डिंबर, श्याम बुरकूल, लेखापरिक्षक शेखर वैद्य, नगरसचिव साजिद अन्सारी, मुख्यअग्निशमन अधिकारी संजय पवार, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, आस्थापना पर्यवेक्षक तौसिफ शेख, प्रभाग अधिकारी बळवंत बाविस्कर, फैय्याज अहमद, भरत सावकार, गृहकर अधिक्षक संतोष गायकवाड, संकिर्ण कर अधिक्षक रमाकांत धामणे, प्रमुख स्वच्छता निरिक्षक एकबाल अहमद जान मोहम्मद, आनंदसिंग पाटील, विभागीय स्वच्छता निरिक्षक उमेश सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने