मालेगाव, ८ नोव्हेंबर २०२३ - नाशिक ग्रामीण पोलिसांच्या रणरागिणी पथकाने रणरागिणी पथकाने येसगाव बु गावातील गोलाईत मळयात गिरणा नदीच्या किनारी काटेरी झाडाझुडूपांमध्ये अवैध दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडून १३८० लीटर रसायन आणि ६९,००० रुपयांचे गावठी हातभट्टीचे प्रोव्हिशन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणरागिणी पथक मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुप्त बातमीदारांमार्फत त्यांना माहिती मिळाली की, येसगाव बु गावातील गोलाईत मळयात गिरणा नदीच्या किनारी काटेरी झाडाझुडूपांमध्ये गावठी हातभट्टी लावून दारू तयार केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात पोलिसांनी १३८० लीटर रसायन आणि ६९,००० रुपयांचे गावठी हातभट्टीचे प्रोव्हिशन जप्त केले.
पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे