नाशिक, दि. ८ नोव्हेंबर २०२३ : सटाणा पोलीस ठाणे हद्दीत रणरागिनी पथक क्र. १ ने धांद्री फाटा येथे एक पिकअप आणि आनंद किराणा दुकानात ४ लाखांचा काळा गुळ आणि गावठी दारुचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन पुरुष आरोपी अटक करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणरागिनी पथक क्र. १ हे अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना धांद्री फाटा येथे एक पिकअप गाडी दिसली. गाडीत काळा गुळ भरलेला होता. पथकातील पोलिसांनी गाडीला थांबवून तपास केला असता, त्यात ४ लाखांचा काळा गुळ आढळून आला.
यानंतर पथकातील पोलिसांनी आनंद किराणा दुकानातही तपास केला. दुकानात गावठी दारु बनविण्याचे साधनांसह काही काळा गुळ आढळून आला. या कारवाईत पिकअप चालक आणि दुकान मालकाला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत मपोहवा / 1486 सोनाली सुदाम केदारे, मपोहवा / 1610 रुतिका भालचंद्र कुमावत, मपोना / 1694 सत्यभामा सुकदेव सोनवणे, मपोशि/ 1947 अंकिता तुकाराम बोडके मपोशि/ 2480 शितल सुकलाल पावरा पोशि / 1955 विलास रमेश सूर्यवंशी आणि चालक पो. हवा 460 पुरुषोत्तम पुंडलीक मोरे यांचा समावेश होता.
सटाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.