📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयाच्या च्या इंग्रजी विभागाच्या विद्यार्थिनींची आश्रय संस्थेला भेट

(मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थिनींनी आश्रय संस्कार आणि पुनर्वसन केंद्रास भेट दिली आणि अनाथ बालकांना सदिच्छा भेट देऊन बालकांशी हितगुज साधले. इंग्रजी विभाग प्रमुख आणि सारा फाउंडेशनच्या संचालिका प्रा. मेश्रामकर सुनेत्रा यांच्या समवेत विद्यार्थिनींनी या बालगृहास भेट दिली. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे देणगी देखील दिली. विद्यार्थिनींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेतले. आश्रय संस्थेचे संस्थापक ॲड. शामकांत पाटील आणि शोभाताई जगताप यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. शामकांत पाटील यांनी आश्रय संस्थेची स्थापना कधी व कशाप्रकारे केली गेली याबाबत विस्तृत माहिती विद्यार्थिनींना दिली. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान आणि समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नाझनीन, कु सबाहतुन्निसा, कु. अम्मारा, कु. हुस्ना, यांच्यासह इंग्रजी विभागाच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने