📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव शहरातील पाणी पुरवठा एक दिवसासाठी खंडित होणार



मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य विद्युत विज वितरण कंपनी यांचे पत्रान्वये दि.03/07/2023 रोजी 220/33kV सायने सबस्टेशन येथे एक्सप्रेस फीडरवरील तांत्रिक कामे करणे आवश्यक असल्याने विज पुरवठा खंडीत होणार असलेबाबत मालेगाव महानगरपालिकेस कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार सदरचे काम करणे अत्यंत आवश्यक असल्याने उक्त कामांसाठी गिरणा पंम्पींग स्टेशन येथील विद्युत पुरवठा 5 ते 6 (कामपुर्ण होईपावेतो) तासांकरीता मोठ्या कालावधीसाठी खंडीत होणार असुन, सदर कामाकरीता Shut Down  करावा लागणार आहे. 
सदरचे काम करणेकामी दि. 08/07/2023 शनिवार रोजीचा शहरातील पाणी पुरवठा करणे अशक्य होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पाणी पुरवठा एक दिवस आड करण्यात येईल. गिरणा धरण येथे महाराष्ट्र राज्य विद्युत विज वितरण कंपनी मार्फत Shut Down घेतल्याने दि.07/07/2023 रोजी नियोजित पाणी पुरवठा हा दि. 08/07/2023 रोजी तसेच 08/07/2023 रोजीचा पाणी पुरवठा करण्यात दि. 09/07/2023 रोजी करण्यात येईल. याची नागरीकांनी नोंद घ्यावी. 
तरी नागरीकांनी वरील तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उशीराने होणाऱ्या पाणीपुरवठया बद्दल मालेगाव महानगरपालिकेस सहकार्य करावे. व पाणी जपुन वापरावे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने