सोयगांवातील इंदिरा नगरात मंगळवारी हल्लेखोरांपासून जीव वाचवत पळणाऱ्या तरुणावर टोळक्याने निर्घृणपणे धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली एखाद्या सिनेमातील दृश्यांप्रमाणे थरारक पाठलाग करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण खून केल्याच्या प्रकार सोयगाव परिसरात घडल्याने या भागात कमालीची खळबळ उडाली होती.
सुनिल बाजीराव गुंजाळ रा. गवळी वाडा हे त्या खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
कॅम्प पोलिसांनी मोठ्या शिताफीने अजय कैलास कापसे, योगेश सोमनाथ कापसे, लक्ष्मण उर्फ लखन गायकवाड, विकास मांजरे या चार संशयित आरोपींना अगदी काही तासातच अटक केली होती व त्यातील संदीप रमेश शिंदे हा संशयित आरोपी फरार होता,
आज कॅम्प पोलिसांनी त्याला चंदनपुरी भागातून अटक केली आहे व त्याच्या जवळील केटीएम दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कॅम्प पोलीस स्टेशनचे API काळे ASI पाटील ,PN आनंद गावंडे , PN आनंद चव्हाण PC सिकंदर कोळी यांनी केली आहे
आज सदर संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले जाईल.
नेमकं प्रकरण काय?
दोन दिवसांपू्वी सोयगावातील इंदिरानगर येथे मयत सुनील गुंजाळ टेहरे चौफुली कडून आपल्या दुचाकीवरून येत असतांना त्याच्या पाठीमागून दुचाकी वरून येणाऱ्या पाच ते सहा जणांनी त्याचा पाठलाग केला. या हल्लेखोरांनी त्याला सोयगाव येथील इंदिरानगर येथे गाठले. त्याला दुचाकीवरून पाडले. तो जीव वाचवण्यासाठी या भागातून सैरावैरा धावत असताना त्याच्यावर या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार मारले. त्याच्या हत्येनंतर हे मारेकरी आपल्या मोटारसायकल वरून धूम स्टाईलने पसार झाले होते.
भर दिवसा झालेल्या या प्रकाराने परिसरात भितीयुक्त धास्ती पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोलीस निरीक्षक काळे व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. या थरारक व भयांकित घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक तेगबीरसिंह संधू यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण व आरोपी हे एकाच समाजाचे असून त्यांच्यातील डुकरे चोरण्याच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे,
यातील मयत तरुण यांचे आरोपींशी काही दिवसापासून वाद सुरू होते,
मयत सुनील गुंजाळ आपल्या दुचाकीवरून पाटणे येथून सोयगाव मार्गे गवळीवाडा येथील आपल्या घरी परतत असताना संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करत इंदिरानगर जवळ लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व यामध्येच मयत तरुणावर एका संशयित आरोपीने धारदार चाकूने छातीवर पोटावर पाठीवर व हातावर सभासद वार करत गंभीर जखमी करून त्यास जीवे ठार मारले,
या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती मिळताच कॅम्प पोलीसानी अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमाप,अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी तेजबीर सिंग संधू, छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगर, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी आर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगात फिरवत पोलीस नाईक आनंद गावडे, पोलीस नाईक जगताप, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड, पोलीस कॉन्स्टेबल सिकंदर कोळी व व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने अजय कैलास कापसे, योगेश सोमनाथ कापसे, लक्ष्मण उर्फ लखन गायकवाड, विकास मांजरे या चार संशयित आरोपींना पळून जाण्याच्या तयारीत असताना दोन आरोपींना कुंदलगाव मनमाड रोड येथून एक आरोपी सायने गावातून व एक आरोपी दरेगाव येथून अटक केली आहे.
अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांचे कौतुक होत आहे.
मयत सुनील व आरोपी यांच्यामध्ये डुकरे चोरण्यावरून वाद होता, त्यामुळे त्यांच्या नेहमीच बाचा बाची होत असल्याची माहिती मिळत आहे, त्याचेच पर्यावसान या खुनात झाले.
सदर तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता व या ठिकाणी रक्ताचा सडा रस्त्यावर पडलेला होता पोलिसांनी रक्ताच्या या थरळात पडलेल्या या तातडीने पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.