📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

र. वी. शाह विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

मालेगाव - शहरातील वर्धमान शिक्षण संस्था संचलित श्री रतिलाल वीरचंद शाह विद्यालयात गुरुवार दिनांक 15 जून 2023 रोजी शैक्षणिक वर्ष 2023- 24 चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य विवेक कासार होती. तर पर्यवेक्षिका स्मिता देशपांडे, ज्येष्ठ शिक्षिका सुजाता बेलन या व्यासपीठावर उपस्थित होत्या. 
            शाळा प्रवेश उत्सवाच्या प्रारंभी विद्यालयात दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसह संगमेश्वर परिसरातून स्वागतपर मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात येऊन पुष्पगुच्छ देण्यात आले . तसेच विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव प्रताप शहा यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या सर्व संचालकांच्या वतीने सचिव प्रताप शाह यांनी नव्या शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आनंदी करण्यात आला. सुट्टीच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. 
            यानंतर सभागृहात प्राचार्य विवेक कासार यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. शालेय शिस्त संदर्भात सूचना दिल्या. शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर संस्कारांची शिदोरी देणारी एक महत्त्वाची संस्था असते. वर्धमान शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढेल अशीच कामगिरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात करावी. आई वडील, गुरुजन यांचा आदर करावा. पुस्तकांची मैत्री करावी असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रूपाली फडके यांनी केली. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने