श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मालेगाव विभाग च्या वतीने वैदीक मंत्रोच्चार मंगलमय वातावरणात अंखड हिंदुस्थान भरातुन गंगा,यमुना,सरस्वती,कावेरी,नर्मदा, गोदावरी,सिंधु अश्या सप्त नद्यांच्या पवित्र जलाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी भगवा ध्वजाचे पुजन करून शिवतीर्थ परीसरात रांगोळी,फुलाची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने परीसर सप्तरंगात उजळून निघाले होते
सप्तनदी, सप्तसिंधुचे जल, सप्तपर्वताची माती व गड किल्ल्यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. फटाक्याची आतीषबाजीने परीसरात प्रती दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले होते,
सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने घोष पथकाद्वारे महाराजाना मानवंदना देण्यात आली ,जय भवानी,जय शिवाजी,या घोषणांनी परीसर दणाणून गेला होता.
यावेळी पवन हिरे,देवीदास पाटील, अशोक कांकरिया,हरिप्रसाद गुप्ता, बन्सीलाल कांकरिया, डाॅ.संतोष पाटील, सुरेश निकम, तिवारी नेविलकुमार, अतुल शिरोडे ,सुनील चव्हाण सर,दिपक पाटील, निलेश हिंगे,निलेश हिंगे,आदित्य पाटकर,तेजस दप्तरी, तेजस विसपुते,राहुल पाटील, पवन वडनेर,डाॅ.सचीन बागुल, गणेश जंगम,अनीकेत पिंगळे, सुमीत सन्यांशीव,दिपक गुप्ता,संदीप गायकवाड, पुनीत अभंग, आनंद माझी,गौरव माळी, कल्पेश टेकाडे, पप्पु पुरकर आदी उपस्थित होते.