मालेगाव - स्व.कवी कमलाकर देसले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने त्यांच्या ' जगणं समजून घेतांना ! ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि ४ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वा. लोढा मार्केट, हेप्पी हॉल मालेगाव येथे हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती ओम देसले यांनी दिली.
' जगणं समजून घेतांना ! ' हे कवी देसले यांच्या जीवन विषयक अनुभवांचे ललितलेखांचे पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंगडे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील साहित्यिक मनोहर विभांडिक, प्रा.के.एन.अहिरे, नगारा साप्ताहिकाचे संपादक प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर उपस्थित राहणार आहेत. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चित्रा देसले, तुषार देसले, स्वाती देसले यांच्यासह देसले कुटुंबीयांनी केले आहे.