देवळा: (आढाव सर) मेशी गावातील अल्पभूधारक शेतकरी श्री कौतिक मोतीराम बोरसे व श्री विठ्ठल मोतीराम बोरसे यांची घराची परिस्थिती अतिशय वाईट असल्याने व घरकुल मध्ये नाव न आल्याने त्यांना अशा परिस्थितीत राहावे लागत असल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्या ऋतूच्या अडचणीमुळे गावातील आजी-माजी सैनिकांनी व पोलीस दलातील भूमिपुत्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अल्पशी मदत म्हणून दोघ कुटुंबांच्या घरांवर पावसाळ्यातील पाण्यापासून वाचण्यासाठी प्रत्यक्ष स्थळे जाऊन दोन ताडपत्रींची मदत केली. गावातील ज्येष्ठ माजी सैनिक श्री दामू अण्णा कापसे यांनी आव्हान केले की अशा या गरीब कुटुंबाला अजूनही सामाजिक संस्था असतील किंवा दानशूर व्यक्ती असतील त्यांनी प्रत्यक्ष स्थळे जाऊन मदत करावी व सरकारने सुद्धा याची दखल घ्यावी अशी मागणी केली. त्याप्रसंगी गावातील काही पत्रकार बंधू व माजी सैनिक प्रवीण बोरसे हे उपस्थित होते.