शिक्षक अभियोग्यता परीक्षा होऊन आणि निकाल लागून जवळ जवळ दोन महिने संपत आले तरीही कोणत्याही प्रकारची हालचाल पवित्र पोर्टल चालू होण्यासाठी दिसत नाही. आधार संच मान्यतेचे काम अपूर्ण आहे या सर्व परिस्थितीमुळे शिक्षक अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी नाशिक तसेच शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना निवेदन दिले
शासनाने कोर्टात दिलेल्या रोड मॅप नुसार भरती प्रक्रिया ऑगस्ट पर्यंत घेऊ असे सांगण्यात आले आहे. सर्व अभियोग्यता धारक विद्यार्थी संदिग्ध अवस्थेत आहेत की पवित्र पोर्टल केव्हा चालू होईल. भविष्यात या विद्यार्थ्यां मार्फत आंदोलन करण्याची तयारी आहे. निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले अभियोग्याता धारक प्रविण बोरवे, हर्षल गांगुर्डे, शरयू फुले , राहुल गवळी, वैशाली वाघ , अमोल भामरे , दिपाली आहेर , दौलत टोपले , भागवत चौधरी , अमृता चौधरी , विनोद बेंडकुळे , शशिकांत गायकवाड ,सागर जाधव , प्राजक्ता गायकवाड, अमृता थविल इ.मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते शिक्षण मंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले होते की 67000 शिक्षक पदे रिक्त असून त्यातील 50% पदे भरण्याची परवानगी वित्त विभागाने दिली आहे मग शासनाने परीक्षा घेण्याची इतकी घाई केली तर पुढील प्रक्रिया इतक्या संथ गतीने का ?
आधार संच मान्यतेनुसार विद्यार्थी संख्या ठरवून मग शिक्षक भरती केली जाणार आहे पण असे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ज्यांना या बाबत खूप समस्या आहेत मग त्यांना तुम्ही बोगस विद्यार्थी म्हणाल का . विद्यार्थी पोर्टल वरील संख्येनुसार विद्यार्थी संख्या निश्चित करून भरती करावे
- प्रविण बोरवे
संस्थापक अध्यक्ष - TAIT नाशिक कृती समिती
राज्य संघटक - युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र राज्य