मालेगांव :-
कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे यांच्या पॅनलचा सुपडा साफ करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते डॉ. अद्वय आबा हिरे -पाटील यांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकहाती सत्ता केंद्र ताब्यात घेत निर्विवाद वर्चस्व मिळवले.
याबद्दल डॉ. अद्वय हिरे यांचे अभिनंदन असून आता दादा भुसे यांनी त्यांचे कारनामे बंद करावेत, सत्तेचा दुरुपयोग थांबवावा अन्यथा त्यांनाही वधस्तंभावर लटकावे लागेल असा इशारा शिवसेना नेते खा. संजयजी राऊत यांनी दिला आहे,
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार खा . संजयजी राऊत यांच्या शुभहस्ते नाशिक येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर , संपर्कप्रमुख संजय दिंडे, सुधाकर पाटील, दत्ता गायकवाड, प्रसाद(लकीदादा) खैरनार, पवनदादा ठाकरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
*" गद्दार गेले, हिरे सापडले"* हा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांचा विश्वास डॉ. अद्वय हिरे यांनी सार्थ ठरविला असून, मालेगावचा शिवगर्जना महामेळावा त्यांनी यशस्वी करून मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकून, पालकमंत्री दादा भुसे यांना धुळ चारली आहे.
आता दादा भुसे यांनी त्यांची नौटंकी, कारनामे, खोट्या केसेसचे आपले उद्योग बंद करावेत, आणि अधिकाऱ्यांनीही लक्षात ठेवावे हे बेकायदेशीर असलेले सरकार जाणारच आहे, तेव्हा कोणत्याही अधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर सरकारच्या मंत्र्यांचे आदेश पाळू नयेत, अन्यथा तुम्ही सुद्धा अडचणीत याल, तुमच्यावर सुद्धा खटले दाखल होतील याची नोंद घ्यावी,
असा कडक इशारा यावेळी खा.संजय राऊत यांनी दिला.
यावेळी डॉ. अद्वय आबा हिरे-पाटील, नंदलाल शिरोळे, विनोद चव्हाण, संदीप पवार, डॉ. उज्जैन इंगळे, रवींद्र मोरे, राजेंद्र पवार,
रवींद्र निकम, सुभाष पाटील, रवींद्र सूर्यवंशी, रवींद्र साळुंखे,
भारती विनोद बोरसे, अरुणा संजय सोनजकर, मीनाक्षी अनिल देवरे, रत्ना प्रवीण पवार आदींचा खा.संजय राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.