📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यातील चिंचवे रामनगर व भवरी शिवारात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचे नुकसान; तात्काळ पंचनाम्याचे आदेश.


  देवळा तालुक्यातील रामनगर, दहिवड भौरी शिवारात तसेच चिचंवे येथे आज दुपारी अचानक अकाशात ढगाचीं गर्दी बघायला मिळताच काही क्षणात जोरदार गारांसह अवकाळी पाऊस होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले तर चिंचवे येथे लग्न मंडपात अक्षादा ऐवजी गाराचां वर्षाव बघायला मिळाला. त्यामुळे वधु वर पक्ष व वऱ्हाडी मंडळीची मोठी धावपळ होऊन तांरबळ उडाली. 
गारांच्या पावसाने मंडप भिजुन खाली आला तर दुसरीकडे पावसाने लग्नातील वऱ्हाडी मंडळीला गारांचा तसेच पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला.

 या आवकाळी पाऊसाने मात्र शेतकरी वर्गाची चिंता वाढवली. शेतीचे मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदे, गहु, हरभरा डाळिंब व फळबागांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आज शनिवार दिनांक १८ मार्च रोजी दुपारी २:३० वा पावसाला या भागात सुरवात झाली तर अनेक आजुबाजुच्या गावानमध्ये हि अवकाळी पाऊस तर कुठे गारपिठ बघायला मिळाली.

या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकरी वर्गाला झोडपले असून आता जगायचे कसे हि चितां मात्र शेतकरी वर्गाला त्रासावत आहे. शासन स्तरावर गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाच्या वतीने करण्यात येत आहे.

सदर गारपीटीच्या नुकसानीबाबत देवळ्याचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता उद्यापासून तात्काळ पंचनामे शासकीय स्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने