दिनांक- ८ एप्रिल २०२३ रोजी नाशिक येथे आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे साहित्य संमेलन एकलव्य रसिडेंशियल स्कुल पेठ रोड नाशिक येथे उत्साहात संपन्न झाले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र कुलकर्णी (सेवानिवृत्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग) तर उदघाटक नितांत कांबळे(सहा.प्रकल्प अधिकारी, नाशिक)प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा सानप, (सहा. प्रकल्प अधिकारी, आयुक्त कार्यालय नाशिक) धनराज पाटील (सहा. प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त कार्यालय नाशिक) उपस्थित होते.
उद्घाटनीय भाषणातून नितांत कांबळे यांनी आदिवासी विकास विभागतील कर्मचाऱ्यांच्या साहित्य संमेलनाद्वारे विविध आदिवासी बोलीभाषेला साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल,या संमेलनाद्वारे साहित्यिक कर्मचारी यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले.
वर्षा सानप यांनी भविष्यात आश्रमशाळेत साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी या संमेलनाचा मोठा वाटा असेल.संमेलनात आश्रमशाळेतील बालसाहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'बालसाहित्यिक कट्टा'निर्माण करावा असे सूचित केले.
संमेलनाध्यक्ष रामचंद्र कुलकर्णी यांनी अधिकारी कर्मचारी यांनी स्वतःच सुरू केलेल्या सृजनात्मक उपक्रमाला शुभेच्छा देत भविष्यातील संमेलनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वस्त केले.
संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरूवात ग्रंथ दिंडीने झाली.शासकीय आश्रमशाळा असरबारी येथील विद्यार्थीनींनी आदिवासी नृत्य सादर केले. उदघाटन समारंभात विभागातील कर्मचारी सोमनाथ गायकवाड,शुभांगी पाटील,शरद अमृतकर,गोपाळ वंजारे, सुनील पगार,(नाशिक)संदीप शेंडे(नागपूर) बालाजी फड(कळवण) हेमंत चोपडे(शहापूर) चतुर्थ कर्मचारी हिरा पवार,तळोदा (विशेष सन्मान) यांना साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल 'आदि साहित्य सेवा सन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन दिपाली आहेर तर आभार धम्मानंद गायकवाड यांनी मानले,
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रातील कवी कट्ट्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक देवचंद महाले यांनी आपल्या कोकणी बोलीभाषेतून कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत उत्स्फुर्त कवितांची मेजवानी दिली.या कट्ट्यात कर्मचारी साहित्यिकांनी आपल्या साहित्याचे सादरीकरण केले.यावेळी उपस्थित रसिकांना नवसाहित्यिकांचा परिचय झाला.
कवीकट्ट्याचे सुत्रसंचालन किरण मेतकर,तर आभार कविता तायडे यांनी मानले