नाशिक (वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील जनता विद्यालय सातपूरमध्ये महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद कांगुणे होते. व्यासपीठावर संस्थेचे सेवक संचालक श्री. चंद्रजित शिंदे, अभिनव बाल विकास मंदिर विभागाचे मुख्याध्यापक निलेश कोर ,विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संगिता आहेर, शरयू नवले, राजेंद्र गाडे, बाळासाहेब मोगल, भरत मुरकुटे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील जेष्ठ उपशिक्षिका श्रीम. विता पाटील, मनिषा कोरडे, यांनी यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे साहेब यांचा जन्म,बालपण, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील कार्या विषयी माहिती सांगितली. सेवक संचालक श्री. चंद्रजित शिदे सर म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, मविप्र संस्थेबद्दल त्यांना आपुलकी होती. कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे साहेब यांचे मविप्र संस्थेसाठी मोलाचे योगदान होते. त्यांनी केलेल्या महान कार्याचा आदर्श घ्यावा. असे मनोगतातून व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रमोद कांगुणे सर म्हणाले की, यशवंतराव चव्हाण बालपणा पासून हुशार होते. त्यांचे मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषांचे अफाट वाचन होते. त्यांनी शैक्षणिक कृषी, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, व सहित्य क्षेत्रातील विकास कामांना प्राधान दिले. कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे यांच्या विषयी बोलतांना म्हणाले की, कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे यांनी १९५१ मध्ये नाशिकला वकिली व्यवसाय सुरू केला. ते १९५४ मध्ये सरकारी वकील तर १९६७ ते १९७७ या दरम्यान जिल्हा सरकारी वकील होते .नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे पंचवीस वर्ष अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी वकिलांसाठी चेंबरची इमारत बांधली १९६१ ते १९८४ दरम्यान ते संस्थेचे सरचिटणीस आणि १९९२ ते १९९७ दरम्यान अध्यक्ष होते.या कालावधीत त्यांनी ग्रामीण भागात माध्यमिक शाळा सुरू करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात ७३ माध्यमिक शाळा तसेच आठ महाविद्यालय सुरू झाले .याच काळात त्यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालय देखील सुरू केले. संस्थेने शिक्षणाचा विस्तार केल्यावर गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्यांनी जोर दिला. त्यासाठी समाजातील, शिक्षितांना प्रोत्साहन देऊन विशेषत: इंग्रजी शिक्षणावर भर दिला. अनेक तज्ञांना त्यांनी संस्थेच्या कामात सहभागी करून घेतले. पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर ते सदस्य होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. सविता आहेर यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार श्रीम. वैशाली दातीर यांनी मानले