📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मेशी येथील विद्यालयात खाऊ बाजार, आनंद मेळावा उत्साहात साजरा

राकेश आहेर:- (देवळा)

   देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय या शाळेत बाल कारागिरांचा खाऊ बाजार अर्थात आनंद मेळावा उत्साहात पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मुलांच्या मनामध्ये जी अनामिक भिती तयार झाली होती ती दुर करण्यासाठी तसेच मुलांना एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी, तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मेशी येथील मंगळवारच्या आठवडे बाजाराचे औचित्य साधुन जनता विद्यालय मेशी या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने एक दिवस दप्तराला विश्रांती देऊन शाळेच्या गेटसमोर बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
   शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे हा यामागील उद्देश होता. खाऊ मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने विविध खाद्यपदार्थांचे दुकाने मांडण्यात आली होती. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाववडा, मिसळपाव, बटाटावडा, इडली सांबर, पाणीपुरी, ओली भेळ, फरसाण, मॅगी, चॉकलेट, कॅटबरी, बिस्कीट पुडा, गुळाचा चहा, कॉफी आदी खाद्यपदार्थ याबरोबर याबरोबर विविध भाजीपाल्याची व फळांची दुकाने मांडली होती.     
   यावेळी शाळेचे प्राचार्य रणधीर डी. जी, शिक्षक पवार टी. पी, मोहन आर. डी, गोविल आर.बी, सोनवणे एम. बी, जाधव एच. ए, बागुल आर. एस, पगार पी. एस, पगार ए. डी, चव्हाण जी. वाय, महाले व्ही. पी, निकम आर. बी, भावसार पी. एस, अहिरे एन. व्ही, खरे पी. पी.
श्रीमती. जोने एम.ए.
श्रीमती. काकडे व्ही. वाय तसेच सर्व विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते व आनंद मेळाव्याचा भरभरून आनंद लुटला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने