📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

स्व. शुभम वाघ यांच्या स्मरणार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव यांच्या वतीने शवपेटीचे लोकार्पण

 रावळगाव | महेंद्र पगार 

 श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव, ता. मालेगाव जि. नाशिक येथे रावळगाव महाविद्यालयात शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

              श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश दादाजी वाघ यांचा मुलगा शुभम वाघ यांचे गतवर्षी अपघाती निधन झाल्यानंतर त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव यांच्या वतीने शेवपेटीचे लोकार्पण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र बी. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.

         यावेळी रावळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पवार, उपसरपंच अशोक आखाडे, दत्ता वडक्ते, राहुल कानडे, आबा बोरसे, संदीप मिटकरी,कारभारी शेवाळे, श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुरेश दादाजी वाघ, हे उपस्थित होत.

            यावेळी रावळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पवार म्हणाले की, रावळगाव सारख्या ग्रामीण भागात महत्त्वाचे असे शेवपेटीचे लोकार्पण केलेले असून एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्या शरीरातून आत्मा जातो, मात्र आत्मा गेल्यानंतर त्या शरीराची हेळसांड न होता, त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी शेवपेटी ही महत्त्वपूर्ण ठरत असते. शवपेटीच्या रूपाने शुभम च्या आठवणी चिरकाल जिवंत राहतील असे प्रतिपादन त्यांनी केले.

            शुभम चे विचार आणि त्याच्या संकल्पना यापुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने स्वर्गीय शुभम वाघ फाउंडेशन नावाने संस्था सुरू केली असून, या माध्यमातून वृक्ष लागवड, असक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच गोरगरिबांना वेळोवेळी मदत केली जाईल असे या ठिकाणी सांगण्यात आले. प्रा. एन. एल. सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. जितेंद्र मिसर यांनी शुभम वाघ यांच्या जीवन प्रवासाची माहिती उपस्थितांना दिली.

            या वेळी महाविद्यालयातील प्रा. शरद आंबेकर, प्रा. भरत आहेर, प्रा. नितीन शेवाळे, प्रा. विजय पगार, प्रा. दिपक आहिरे , प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. अदिती काळे, प्रा. मोहिनी निकम, प्रा. लक्ष्मी बोरसे, प्रा. सोनाली निकम, प्रा. मयुरी निकम, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. तनुजा सूर्यवंशी यांच्या सह महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. त्रिमूर्ती सोमवंशी, कार्यालयीन अधीक्षक दिपक पवार, महेंद्र पगार, शालिवाहन ठोके, राकेश पाटील, प्रवीण देवरे, दत्तात्रय पाटील, अमोल शिंदे, किरण बच्छाव, कमलेश अहिरे, गिरीश पवार, महेश बच्छाव, सचिन भदाणे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने