📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

खामखेडा येथील मराठा विद्याप्रसारक समाज संचलित जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. भामरे यांचा सेवापूर्ती सत्कार

खामखेडा : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संचलित जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. भामरे हे 30 नोव्हेंबर रोजी 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याने यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मविप्र संचालक विजय पगार होते. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे माजी संचालक डॉ. विश्राम निकम, माजी सरपंच संजय मोरे, निवृत्त शिक्षक एन. जी. शेवाळे, नानाजी मोरे, अण्णा पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळू शेवाळे, दादाजी बोरसे उपस्थित होते. श्री. भामरे यांनी तीस वर्ष शिक्षक म्हणून व तीन वर्ष मुख्याध्यापक म्हणून संस्थेच्या सहा शाखांमध्ये विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी आवश्यक परीक्षा व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले. मविप्र संचालक विजय पगार , माजी संचालक डॉ. व्ही. एम. निकम, राकेश आहेर, दिनेश पगार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सभासद बारकू मोरे, सदाशिव वाघ, नानाजी मोरे, बारकू शेवाळे, उषा बोरसे, माजी सरपंच संजय मोरे, रमेश शेवाळे, "दत्तू हिरे, मुकुंद बोरसे, शिक्षक बी. वाय. सोनवणे, आर. एच. आहेर, एम. जी. जगताप, एच. एन. कुवर, के. आर. भामरे, आर. के. पाटील, एस. पी. पगार, जे. टी. साळुंके, आय. जी. थोरात, वाय. बी. रौंदळ, टी. टी. कोर, बी. एस. निकम, डी. एस. पाटील, एस. बी. सोनवणे आदी उपस्थित होते. तुषार कोर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने