महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के. बी. एच. विद्यालय मालेगाव कॅम्प येथील विद्यार्थ्यांनी बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, बुद्धिबळ, भालाफेक, मैदानी स्पर्धा(धावणे 'चालणे) या जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून विभागीय स्पर्धेसाठी निवड . मालेगाव मनपा जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये शहरातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. त्यात के.बी.एच. विद्यालय मालेगाव कॅम्प येथील विद्यार्थ्यांनी बॉक्सिंग स्पर्धेत- राजवर्धन पवार, रोनित शेवाळे, विशाल चौधरी, अथर्व बोरसे .किक बॉक्सिंग स्पर्धेत -रोनित शेवाळे, वेदांत देवरे, लोकेश शेवाळे, भावेश बोरसे,, बुद्धिबळ - रूपाली भदाणे, भालाफेक-यश सावळे, मैदानी स्पर्धेत- वेदांत काळे ,प्रवेश सावळे, जान्हवी बोराळे, नम्रता पवार ,रूपाली आणि दिव्यांनी या खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले.
यशस्वी खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय संपादन करून विभागाला निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक शशिकांत पवार, विनोद लभडे, योगेश गांगुर्डे, जे. टी. ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक यांचा सत्कार प्राचार्य कैलास दाभाडे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील , पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक सुभाष निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभागाचे राजेंद्र शेवाळे, राजेश धनवट ,सुनील सूर्यवंशी ,हेमंत पगारे तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.