📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पाऊसामुळे पिके पाण्याखाली ; शेतकरी पुर्णतः हवालदिल

राकेश आहेर:- (चांदवड देवळा)

    चांदवड देवळा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, लाखो रुपये खर्च करून पोटच्या पोरांनप्रमाणे जतन केलेली पिके आपल्या डोळ्यासमोर नेस्तनाबूत होत आहेत, मात्र प्रशासन याकडे लक्ष देवून सरसकट पंचनामे करणार का ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. तालुक्यात झालेल्या अतिवष्टीमुळे अनेक पिकांमध्ये पाणी असल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामा करण्याची मागणी केली आहे. तसेच तहसीलदार महोदयांनी स्वतः पाहणी करून अहवाल सरकारपर्यंत पाठवावा ही मागणी जोर धरू लागली आहे.
    यावर्षी उन्हाळ कांद्याला चांगले दर मिळाले नाहीत त्यामुळे कांदा चाळीतचं सडतो आहे. आता शेतकऱ्यांची लाल कांद्याची लागवड काही ठिकाणी सुरू आहे, सततच्या पावसाने कांदा लागवडीस उशीर होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कांदा रोप सडले आहे. यामुळे लाल कांदा लागवड करायची केव्हा हा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळी कांद्याचे बी नुकतेच अनेक शेतकऱ्यांनी टाकले तेव्हापासून पाऊस सुरू असून बियाणे जमिनीतून उगवले नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवले आहे, आता नवीन बियाणे घेणे शेतकऱ्यांच्या नाके नऊ आल्याचे दिसून येत आहे. 
    बाजरी कापणीस आली असल्याने अनेक ठिकाणी पाऊस व वाऱ्याने बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे, बाजरीच्या कणसांना अक्षरशः कोंब फुटले आहेत. मका, सोयाबीन या पिकांना देखील मोठा फटका बसुन १०० टक्के नुकसान झाले आहे. 

(चौकट) अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे, शासनाने तातडीने दखल घेऊन सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी
   _ राजु शिरसाठ
नाशिक जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना 

(चौकट) चांदवड देवळा तालुक्यात पावसाची सतत धार चालू आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. टाकलेले पीक तर नेस्तनाबूत झालेलेच आहे पण यापुढील पीक घेणेही जिकिरीचे झाले आहे, यामुळे शासनाने सरसकट नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. 
   _ विष्णू जाधव
प्रवक्ते अ.भा.छावा संघटना 

(चौकट) अनेक शेतकऱ्यांच्या पिकात भरपूर प्रमाणात पाणी साचलेले आहे, उत्पन्न तर हातचे गेलेचं आहे निदान गुरांना चारा तरी काही प्रमाणात कामी येईल यासाठी पिकांनमधील साचलेले पाणी काढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे.
    _बापुसाहेब जाधव
शिवसेना देवळा तालुका अध्यक्ष

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने