📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात श्री अमित खरे यांचे व्याख्यान

(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात महिला सुरक्षा  विकास समिती आणि पर्यावरणीय जागरूकता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी मालेगावातील सुप्रसिद्ध वन्यजीव रक्षक श्री अमित खरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 
भारतातून नामशेष झालेला चित्ता पर्यावरण संवर्धनासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी का आवश्यक आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी काय करणे आवश्यक आहे  याबाबत विस्तृत आणि महत्त्वपूर्ण माहिती श्री अमित खरे यांनी जे ए टी महिला महाविद्यालयात आयोजित केलेल्या व्याख्यानात दिली. हिंस्र प्राण्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात भीती असते त्याचप्रमाणे कुतूहल देखील असते. नुकत्याच भारतात आणलेल्या चित्त्यांबद्दल विद्यार्थिनी मधील असलेले कुतूहल जाणून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात श्री अमित खरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थिनींना दिली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते . प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांची होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर  (समन्वयक महिला  सुरक्षा आणि विकास समिती) यांनी केले कुमारी मरियम हिने केलेल्या सुश्राव्य कुराणपठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. मुनज्जा इरम हिने सूत्रसंचालन केले. कु. अनुशिया अन्सारी हिने उपस्थितांचे आभार मानले. सदर व्याख्यानासाठी दीडशेहून अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. इस्माईल यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने