मालेगांव (जय योगेश पगारे) तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर वाके फाट्यावर काल रात्री एका दुचाकीस्वाराला मद्यधुंद पिकअप वाहनचालकाने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गणेश देवाजी बच्छाव (३५)असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून, आपल्या दुचाकी वर (MH41BB8353) घराकडे जात असताना पिकअप(MH02XA7471) ने सदर तरुणाला उडवल्याने तो जागीच गतप्राण झाला.
गेल्या एक वर्षात याच वयोगटातील सुमारे पाच ते सहा तरुणांचा अशाच प्रकारे अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आज सकाळी वाके फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवला.