📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

प्रत्येकाने इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे गरजेचे – प्राचार्य प्रा. नारायण सोनवणे

  कुकाणे (महेंद्र पगार-पाटील) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगांव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

       या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक या संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सुरेश दादाजी वाघ हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नारायण एल. सोनवणे हे होते.

        यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नारायण एल. सोनवणे म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस संपूर्ण भारतीयांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस असून, आजच्याच दिवशी भारताला ब्रिटीशांच्या जुलमी साम्राज्यवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने अनेक काटेरी मार्गातून खडतर प्रवास करत करत आजचा हा विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतासमोर अनेक आव्हाने अभी होती, त्यातच देशाची फाळणी होऊन नव राष्ट्र निर्मितीची अनेक आव्हाने निर्माण झालेली होती. या सर्वांना व्यवस्थितपणे हाताळत देशाची पुनर्बांधणी करून एक नवीन राष्ट्र निर्माण करावयाचे होते, या सर्वांचे आव्हान पेलत भारताने स्वातंत्रोत्तर काळात मर्यादित साधन संपत्तीच्या सहाय्याने जी प्रगती केली आहे, ती नेत्रदिपक असून भारतीय स्वातंत्र्याने जगाला स्वयं विकासाचा नवा आदर्स घालून दिला आहे, परंतु भारतीय स्वातंत्र्यासमोर आजही अनेक आव्हाने उभी आहेत, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीय, धार्मिक तेढ, अंधश्रद्धा अशी अनेक आव्हाने भारतासमोर उभी आहेत, त्यामुळे या सर्वांपासून देशाला वाचवण्यासाठी व नवे राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे गरजेचे आहे, प्रत्येकाने इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर केला तरच भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण होईल व देश जगात महासत्ता म्हणून नावा रुपाला येईल असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगांव येथील कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा. नारायण एल. सोनवणे यांनी केले.

या वेळी महाविद्यालयातील साक्षी पवार व सिद्धी पवार या विद्यार्थींनीनी आपले मनोगत व्यक्त केले.

        या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास एन. पाचंगे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अदिती काळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.भरत के.आहेर यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. जितेंद्र व्ही मिसर, प्रा.एस.टी.आंबेकर, प्रा.जे.के.अहिरे, प्रा. पूनम गवळी, प्रा. मोहिनी निकम प्रा. विजय पगार, प्रा. मयुरी निकम, प्रा. सारिका सोनवणे यांच्या सह कार्यालयीन अधिक्षक दिपक पवार महाविद्यालयाचे ग्रंथपाल डी.व्ही.पाटील, यांच्या सह महाविद्यालयीन कर्मचारी महेंद्र पगारे, शालीवान ठोके, राकेश शिरसाठ, मंगेश नंदाळे, मनोहर राजनोर, अमोल शिंदे, डी.सी. पाटील, प्रवीण देवरे, किरण बच्छाव, कमलेश अहिरे, गिरीश पवार, महेश बच्छाव,सचिन भदाणे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने