📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वात्सल्य परिवारातील ज्येष्ठ नागरिकांचा सामुहिक वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा; नासिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री.सचिन पाटील व अभिनेते अक्षय मुडावदकर प्रमुख पाहुणे

प्रमुख पाहुणे म्हणुन नासिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मा.श्री.सचिन पाटील व जय जय स्वामी समर्थ सीरियलचे फेम अभिनेते मा.श्री,अक्षय मुडावदकर 

नाशिक (रुपेश जगताप • राजेश धनवट ) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन "वात्सल्य"परिवारातील सर्व आजी व बाबांचा सामुहिक वाढदिवस "वात्सल्य वृद्धाश्रम"हिरावाडी रोड,नासिक याठिकाणी आनंदात पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नासिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मा.श्री.सचिन पाटील व जय जय स्वामी समर्थ सीरियलचे फेम अभिनेते मा.श्री,अक्षय मुडावदकर, टीव्ही अभिनेत्री स्मिता प्रभू व शिल्पी अवस्थी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी या सर्व निराधारांशी मनसोक्त गप्पागोष्टी केल्या.विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.भजनसंध्या व म्युझिकल शो अशा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.वात्सल्य परिवाराचे संस्थापक श्री.सतीश सोनार(मालेगाव) प्रा.श्री.जयंत शेवाळे,ओम् ठेपणे व श्री.चेतन संगमनेरे यांंनी "वात्सल्य"परिवाराची माहिती मान्यवरांना दिली.तसेच प्रमुख अतिथींचे स्वागत करुन आभारही मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने