📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेशीत आजी माजी सैनिकांनी केले ध्वजारोहण

राकेश आहेर :- चांदवड देवळा

   स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव पर्वानिमित्त देवळा  तालुक्यातील मेशी येथील जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण वगळता सर्वच ठिकाणी देशाची अहोरात्र सेवा करणाऱ्या आजी माजी सैनिकांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.
   यावेळी प्रथमतः जनता विद्यालय मेशी या शाळेचे ध्वजारोहण माजी सैनिक प्रविण बोरसे यांनी केले, ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण माजी सैनिक दामु कापसे यांच्या हस्ते, सोसायटीचे ध्वजारोहण सैन्यदलातील जवान शाम बोरसे, नवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलचे ध्वजारोहण सैन्यदलातील जवान तुषार शेवाळे यांच्या हस्ते, तर मेशीलगत असलेल्या खडकतळे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सैन्यदलातील जवान तुषार पगार यांचे हस्ते करण्यात आले. तर जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण मेशीच्या उपसरपंच पदाचा नुकताच कार्यभार स्विकारलेल्या नंदाबाई पंडित शिरसाठ यांच्या हस्ते झाले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, सर्व पक्ष संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, देशप्रेमी नागरिक व विद्यार्थी असंख्य संख्येने उपस्थित होते.
   मेशी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले.    नवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ग्राऊंडवर माजी सैनिक प्रविण बोरसे यांनी सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनसाठी नवनाथ सैनिकी आणी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे. यामुळे हजारो रुपये खर्च करून, शहरांत जाऊन भरतीपूर्व प्रशिक्षण घेऊ शकत नाही अशा तरुणांनसाठी अत्यल्प दरात ही सुविधा मेशी सारख्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सैन्यदलात भरती होणाऱ्या गरिब युवकांसाठी अगदी कमी खर्चात भरतीपूर्व प्रशिक्षणाचा हा कदाचित पहिलाच उपक्रम आहे. 
   यानंतर नवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल मेशी येथे आजी माजी सैनिकांनाचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्याकडील कलागुणांचे कौशल्य सर्वांसमोर करून दाखवले. तसेच जानेवारीत येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी जे विद्यार्थी वर्षभरात शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध ठिकाणी सहभाग घेऊन उत्कृष्ट गुणवत्ता दाखवतील अशा विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य बी.एन बोरसे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने