के. बी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच एनसीसी स्काऊटच्या उत्कृष्ट संचलनाने मोठ्या जल्लोषात व दिमाखात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रवीण पाटील (आबासाहेब ) होते. यावेळी प्रमुख अतिथी माजी प्राचार्य तथा संस्थेचे संचालक तात्यासाहेब अनिल पवार , ज्येष्ठ नागरिक सूर्यमुखी हनुमान मंदिर अध्यक्ष जगन्नाथ काळुंखे , माजी प्राचार्य डी.यु. पाटील, माजी प्राचार्य बी. वाय. पाटील, माजी प्राचार्य ए.व्ही. देवरे, माजी प्राचार्य डी. एस. देवरे, माजी प्राचार्य पी.सी. महाले,सेवानिवृत्त शिक्षक हेमंत देवरे (मोठाभाऊ) ,श्रीमती पुष्पा वाघ , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रविण नेरकर, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक सुभाष निकम, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र विसपुते ,संजय सूर्यवंशी, ज्येष्ठ प्राध्यापिका शितल शिंदे, ज्येष्ठ शिक्षक योगेश गांगुर्डे, एम. पी. पवार, डी. के. सोनजे , आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ काळुंखे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथीच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात वैयक्तिक देशभक्तीपर गीते,समूह गीत, वैयक्तिक नृत्य ,समूह नृत्य, पोवाडा, भाषण , अभंग अशा विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी तसेच एन.सी.सी.व स्काऊटच्या उत्कृष्ट संचालनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने चित्रकला. निबंध. रांगोळी. वक्तृत्व आदी स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तु देउन गौरवण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती पुष्पा वाघ यांनी गरीब विद्यार्थ्यांना पाच डझन वह्या भेट दिल्या तसेच एक सुंदर देशभक्तीपर गीत सादर केले.माजी प्राचार्य बापूसाहेब डी.यु. पाटील यांनी इयत्ता पाचवीतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून वर्षभर शैक्षणिक खर्च करण्याचे ठरवले.विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्वच मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार राजेश धनवट यांनी मानले. एनसीसी विभागाचे प्रमुख आर. के. बोरसे, स्काऊट विभागाचे प्रमुख एस. एस. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट असे संचलन यावेळी संपन्न झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक तथा सांस्कृतिक विभागाचे उपप्रमुख शशिकांत पवार ,जे.टी. ठाकरे, एस.एल.निकम,जितू बच्छाव, सुनील सूर्यवंशी, हेमंत पगारे, व्यंकट मगर ,श्रीकांत पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर बंधू यांचे मोलाचे सरकारी लाभले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी ,शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू त्याचप्रमाणे पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात, उत्साहात साजरा करण्यात आला.
.jpeg)
