📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालया तर्फे स्वराज्य महोत्सवानिमित्त तिरंगा रॅली


( मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ, समान संधी कक्ष आणि रासेयो विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हातात तिरंगा घेऊन घोषणा देत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली ची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान आणि महाविद्यालय समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सदर रॅलीमध्ये विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अन्सारी फरजाना आणि समान संधी कक्षाच्या समन्वयक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी विद्यार्थिनींच्या समवेत घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वाटप केले. विद्यार्थिनींनी दिलेल्या घोषणातून जाज्वल्य देशभक्ती प्रगट झाली. पुनश्च महाविद्यालयाच्या प्रांगणात येऊन या रॅलीची सांगता झाली. रासेयो अधिकारी प्रा. अन्सारी अबुलेस निहाल अहमद आणि डॉ. खान रुमाना यांनी देखील सहभाग नोंदविला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने