गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीला पूर आला आहे, पुराचे पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत असून नागरिक पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत, अनेक पुलांवरून पाच ते दहा फुटावरून पाणी वाहत आहे त्यामुळे प्रशासनाने पूर पाण्याजवळ कोणी जाऊ नये असा गंभीर इशारा दिलेला असताना सुद्धा काही लोकांना ते कळत नाहीये, अशातच मालेगाव येथील जुन्या गिरणा पुलावरून एका स्टंटबाज तरुणाने पाण्यात उडी मारल्याने तो बेपत्ता झाला आहे
नईम मोहम्मद अमीन असे हे तरुणाचे नाव असून तो मालेगावातल्या किल्ला परिसरातील राहणारा आहे.
आज दुपारी खवळत्या पाण्यात उडी मारल्यापासून तो बेपत्ता असून त्याचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात आहे.
दरम्यान प्रत्येक वर्षी अशा फालतू स्टंट्समुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तसेच प्रशासनावर देखील विनाकारण ताण येतो.
नागरिकांनी आपापली जबाबदारी समजून घेत शिस्तीत वागणे अपेक्षित आहे, नाहक जीव गमवावा लागल्याने परिवाराला मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागते. अशा स्टंटबाज तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांना सदर ठिकाणी बंदोबस्त लावावा लागणार आहे