📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

लोहोणेर जनता विद्यालयात व्यासमुनींच्या प्रतिमेला वंदन करून गुरुपौर्णिमा साजरी

पत्रकार - प्रशांत गिरासे नाशिक


लोहोणेर-: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात गुरू शिष्याची महती सांगणारी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात व्यासमुनींच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी हे होते तर पर्यवेक्षक बी.के.जाधव व  सर्व शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी  विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व गुरुजनांचा पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यालयाच्या वैदही एखंडे, कल्याणी देशमुख, स्वामिनी सूर्यवंशी,निशा आहेर, सिद्धी सूर्यवंशी, हर्षाली बच्छाव व भूमी आहिरे आदी विद्यार्थ्यांनी  गुरुंविषयी महत्त्व व महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. शेवटी मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत जीवनात प्रत्येकाने कोणाला तरी आपले गुरू मानले पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते व गुरूंचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी ऐश्वर्या निकम व प्रतिक्षा बरदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख एस.बी.एखंडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने