देवळा व बागलाण या दोन तालुक्यांची हद्द सांगणार गिरणा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
निंबोळा येथे गिरणा नदीवर ब्रिटिश कालीन पुल आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. कसमादे परिसरातील दळणवळणाची सोय या रस्त्याने होते .
परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा नदीवर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून हा पुलं बंद करण्याचे आदेश तहसीलदार सुर्यवंशी साहेब यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार निबोंळयाचे तलाठी गावित, व महसूल विभागातील सर्वच कर्मचारी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत.
पुढील अपडेट्स आपल्याला अपडेट स्वरूपात मिळतील
1)महालपाटणे केटीवेअर वरून दहा ते पंधरा फूट पाणी
2)बाबुराव पोपट, अरूण पोपट अहिरे महालपाटणे यांच्या शेतात घुसले पाणी ,
3)स्मशानभूमीत पाणी
4) पाण्याचा प्रवाहात वाढ