📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस ,भाविक जखमी.




पत्रकार प्रशांत गिरासे

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या व नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड येथे आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सप्तशृंगी गडावर गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. आज दि.११ दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सप्तशृंगी मंदिरातील परतीच्या मार्गावरील संरक्षक भिंतीवरील दगड, माती वाहून आल्याने ४ भाविक व २ लहान मुले खाली कोसळून गंभीर जखमी झाले. सप्तश्रृंगी देवस्थान संस्थानच्या दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये दोन महिला, दोन पुरूष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. परतीच्या मार्गावरील डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असल्याने या पाण्याचा जोर वाढल्यामुळे हे पाणी संरक्षण भितीवरून मोठ्या प्रमाणात वाहु लागल्याने ही भिंत कोसळून पायरीवर मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागले. यावेळी भाविक हे पायरी उतरत असतांना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पायरीवरुन वाहत गेले. या घटनेत भाविकांच्या डोक्यावर व हात पायाला गंभीर इजा झाली. याबाबत देवी संस्थान चे कर्मचारी व स्थानिक व्यापारी यांना
समजल्याबरोबर तातडीने भाविकांवर देवी संस्थानच्या दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. या घटनेत निंबाबाई नानु नाईक वय ४५  रा. एंरडोल, अशिष तांरगे वय २३ रा.नागपुर, मनिष राऊत वय ३२ रा.नागपूर, पल्लवी नाईक वय ३ रा. एरंडोल, शैला आव्हाड वय ७ यांना पुढील उपचारासाठी वणी येथे पाठविण्यात आले आहे. डॉ. धनश्री घोडके, निशा गायकवाड, कंपाउंडर शाताराम बेनके यांनी जखमींवर उपचार केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने