📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सर्वोच्च न्यायालाकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १६ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने मुखयमंत्री शिंदे यांच्या गटाला  मोठा दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालायने याप्रकरणी तातडीची सुनावणी नाकारली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १६ आमदारांविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज, ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे महाराष्ट्राच्या या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या आमदारांना उद्या विधानसभा अध्यक्षासमोर उत्तर द्यायचे आहे, अशा स्थितीत या प्रकरणाची आज सुनावणी व्हायला हवी अशी मागणी सिब्बल यांनी केली. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने