बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायत येथे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या समाधान निंबा पाटील ( 37 ) याने ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,
याबाबत जायखेडा पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दुसरा कर्मचारी सुरेश गांगुर्डे आज सकाळी कार्यालयात गेला असता संगणक कक्षात समाधान याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे लक्षात आले, याबाबत पोलीस पाटील शीला भामरे यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जयखेडा पोलिस स्टेशनचे पोउनि. नवनाथ रसाळ व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शव खाली उतरून पोस्टमोर्टमसाठी पाठविले.
दरम्यान रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होत असल्याने पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळी कार्यालयात कामाला असायचे त्यामुळे रात्रीच आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे,
पोस्टमार्टम झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
