📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नांदगाव येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर माथेफिरु गुंडाचा आरपीएफ अधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला

नांदगाव (प्रतिनिधी ) येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका माथेफिरू तरुणाने रेल्वे पोलीस  दलाच्या अधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सकाळी नांदगाव येथे घडली आहे, नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्यांना मालेगाव येथील प्रयास हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात  खळबळ उडाली असून या प्रकारामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे 

आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास रेल्वे पोलीस अधिकारी डि.के. तिवारी  गस्तीवर असतांना  सदर माथेफिरू प्रवाशांना त्रास देत होता त्यामुळे या  तरुणास हटकले असता आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली ,नंतर कुठे जायचे असे विचारल्यावर त्याने नागपूर येथे जायचे असे सांगितले त्यानुसार सदर अधिकाऱ्यांनी सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस येईल त्यावेळेस तुम्ही जाऊ शकता आता प्लॅटफॉर्मवर  फिरू नका, बाहेर जाऊन बसा अशी विनंती केली, परंतु सदर तरुणाने पुन्हा प्लॅटफॉर्मवर चकरा मारणे सुरुच ठेवले.

 पोलीस अधिकारी तिवारी यांनी त्याला पुन्हा समजावून सांगितले असता तो ऐकण्यास तयार नव्हता, त्यामुळे त्याला कार्यालयात आणले, पण त्याने कार्यालयाचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला , यावर तिवारी यांनी त्याला दरवाजा का बंद करतोय असे विचारले असता यावेळी त्याला राग आल्याने सदर इसमाने त्याच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने तिवारी यांच्यावर हल्ला चढविला.

या हल्ल्यात तिवारी यांना  खोलवर जखमा झाल्या असून भरपूर रक्तस्राव झाला होता त्यावेळी इतर पोलिस अधिकाऱ्यांनी तिवारी यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले, ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 

सुकेश लीलाधर तिरडे वय 25 रा. गोंदिया असे या माथेफिरु तरुणाचे नाव असून तिवारी यांच्यावर हल्ला करून त्याने पळ काढत  एका बोगी वर जाऊन रेल्वे स्टेशनवर वर चांगलाच  धिंगाणा घातला होता त्याने स्वताच स्वतच्या मानेवर हातावर वार करून घेतले, नांदगाव शहर पोलीस व रेल्वे पोलीस नागरिकांच्या मदतीने सदर माथेफिरु ला ताब्यात घेतले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने