मालेगाव ( जययोगेश पगारे) कॅम्प भागातील गवळीवाडा येथून सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची नुरा जातीची काळया रंगाची म्हैस अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची फिर्याद महादू मल्लू गवळी (55) रा. एकता नगर, गवळीवाडा मालेगाव कॅम्प यांनी रविवार १७ जुलैला कॅम्प पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती, त्या अनुषंगाने कॅम्प पोलिसांनी मोठी कारवाई करत शाहरुख रज्जाक पठाण (२४) रा. हिंगलाज नगर, मोहम्मद शाहरुख मोहम्मद सुलेमान अन्सारी (२१) रा. ताज बेकरी जवळ मालेगाव, शेख फैसल शेख शरीफ (१९) रा. राहुल नगर, तौसीफ उर्फ आदिल शेख शकील (२०) रा. ताज बेकरी जवळ या चार जणांना अटक केली आहे.
सदर आरोपींना न्यायालयापुढे सादर केले असता न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण - सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक- चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी - प्रदीप कुमार जाधव, कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पो.निरीक्षक पी.आर. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. योगेश पवार, पो. कॉ. सिकंदर कोळी यांनी ही कारवाई केली.
खूप कमी वेळात या चोरीचा शोध घेत छडा लावल्यामुळे कॅम्प पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.