अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीचा तलवारीने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज (दि ०७) घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरात ते अंबड एमआयडीसीतील जेपी स्वीटजवळ असलेल्या आहेर इंजिनियरिंग कंपनीत कार्यरत होते.आज (दि ०७) सकाळी दहा वाजेच्या सुमारास कंपनीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचे वाहन थांबवून काही संशयितांनी तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला.या घटनेत आहेर यांचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
नंदकुमार निवृत्ती आहेर (वय ५०, रा. महात्मा नगर) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले खुनाचे सत्र सुरूच आहे, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा दाखल झाला असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.१८ दिवसात ८ खून झाल्याने कायदा सुव्यवस्तेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे