📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

गट, गण प्रारुप आराखड्यावर हरकती प्राप्त:- उद्या हरकती साठी शेवटची तारीख, हरकतींचा आकडा वाढण्याची शक्यता


जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचा प्रारुप (कच्चा) आराखडा जाहीर झाल्यानंतर यावर आता हरकतींची संख्या वाढत चालली आहे.

तीन दिवसांत 16 हरकती जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये गटांची मोडतोड हेतूपुरस्सर करण्यासह विविध आरोप करण्यात आला आहेत.

सोमवारी (दि. 6) तब्बल 13 हरकती आल्याने प्रशासनाचे काम वाढले आहे. जिल्हा परिषदेचा प्रारुप आराखडा 2 जून 2022 रोजी जाहीर झाला. त्यावर हरकती नोंदवण्यासाठी 8 जूनपर्यंत मुदत आहे.पहिल्या दोन दिवसांत 3 हरकती प्राप्त झालेल्या असताना सोमवारी दिवसभरात 13 हरकती आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यात दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी तालुक्यातील गटांची रचना सदोष असल्याचे सांगत ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

निफाड तालुक्यातील करंजगाव गटातून एक हरकत प्राप्त झाली आहे. बागलाण तालुक्यातून दोन हरकती प्राप्त झाल्या असून, बोधडी व बिलपुरी ही गावे पूर्वीच्याच गटात समाविष्ट करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातून सहा हरकती प्राप्त झाल्या असून, भूत मोहाडा हे गाव हरसूल गटाला जोडण्याची मागणी केली आहे. वायगडपाडा हे गाव हरसूल गटाला जोडण्यासह इतर दोन प्रकरणांवर त्यांनी हरकत घेतली आहे.

चांदवड तालुक्यातूनही हरकत घेण्यात आली आहे. दुगांव गटातून वगळण्यात आलेले कळंबदरी हे गाव पुन्हा जोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पळसे गटाविषयी दोन हरकती प्राप्त झालेल्या आहेत. पंचायत समितीच्या गणात सदोष रचना झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून ही रचनाच रद्द करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे.

सिन्नर तालुक्यातून पहिली हरकत प्राप्त झाली आहे. गटांची मोडतोड हेतूपुरस्सर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने