प्रशांत गिरासे ( देवळा )महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे.
बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
▪️ 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्याकरता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर बघायला मिळणार आहे.
▪️ तुम्ही उद्या www.mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहू शकता.
▪️ विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी परीक्षेवेळी वापरलेला सीट नंबर/ रोल नंबर आणि विद्यार्थ्याच्या आईचं नाव अशी माहीती आवश्यक असणार आहे.
▪️ ऑनलाईन पद्धतीनं इंटरनेटवर निकाल पाहिला की प्रिंट आऊट नक्की घ्या, म्हणजे इतरत्र उपयोग होई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती.
Whatsapp group is full send another number to join the group
उत्तर द्याहटवा