📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

खुशखबर ! पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त

मोदी सरकारकडून पेट्रोल ९.५० तर डिझेल रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
 अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ही घोषणा केली आहे.

निर्मला सीतारामण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “केंद्राने पेट्रोलवर ८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील ६ रुपये प्रति लिटर केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलचे दर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहे.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलच्या किमती ७ रुपये प्रति लिटरने कमी होतील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या उत्पादनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने