📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवपुरपाडे येथे सिंगल फेज योजना मंजूर

  *प्रतिनिधी देवळा: ज्ञानेश्वर आढाव*
        देवळा तालुक्यातील देवपूर पाडे येथील काही भागात रात्री चा वीजपुरवठा होत नव्हता . त्यामुळे जंगलली प्राण्यांच्या त्रास तेथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होत होता. 
          ही बाब देवपूरपाडे येथील ग्रामपंचायत सदस्य अजय अहिरे यांच्या निदर्शनास आली व त्यांनी तात्काळ दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारतीताई पवार, चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ राहुल दादा आहेर यांची भेट घेऊन त्यासंदर्भात त्यांना निवेदन दिले. 
      देवपुरपाडे येथील दत्तनगर शिवार व चिंच मळा शिवार सिंगल फेज योजना मंजूर व्हावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यास यश सुध्दा आले.खासदार डॉ.भारतीताई पवार यांनी सुध्दा निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ते मंजूर केले.
      त्याबद्दल देवपुरपाडे येथील दत्तनगर शिवार व चिंच मळा शिवार येथील शेतकऱ्यांनी खासदार डॉ. भारतीताई पवार, चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ राहुल दादा आहेर, देवपुरपाडे वि का सोसायटीचे चेअरमन अभिमान अहिरे, ग्रामपंचायत सदस्य अजय अहिरे यांचे आभार मानले.
         तसेच आम्ही सर्व शेतकरी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे मत तेथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने