वासोळ (ता.देवळा)येथील फुलेनगर शिवारात देवकाबाई हरी सोनवणे नामक महिला आपल्या गुरांसाठी चारा कापत असताना गट नंबर ३३/२ मधील ऊसा मधून २ बिबट्यांनी देवकाबाई यांच्यावर हल्ला चढवला यात बिबट्यांनी पाय तोंडात पकडल्यामुळे महिलेच्या पायाला जखम झाली आहे.
सुदैवाने पती जवळच असल्यामुळे पतीने जोराने आरडाओरड केल्यामुळे बिबट्यांनी तेथून धूम ठोकली यामुळे देवकाबाई थोडक्यात बचावल्या.