📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महालपाटणे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी शिवाजी आप्पा अहिरे व व्हा.चेअरमन पदी नानाजी भागा अहिरे यांची बिनविरोध निवड

      प्रतिनिधी देवळा: ज्ञानेश्वर आढाव
     
       देवळा तालुक्यातील महालपाटणे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक झाली होती . त्या जय मल्हार पॅनेलचे सर्व तेरा उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे काल घेण्यात आलेली चेअरमन व व्हा . चेअरमन पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली.
          शिवाजी आप्पा अहिरे यांचा एकमेव अर्ज चेअरमन पदासाठी आला व व्हा.चेअरमन पदी सुध्दा नानाजी भागा अहिरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे चेअरमन पदी शिवाजी आप्पा अहिरे व व्हा . चेअरमन पदी नानाजी भागा अहिरे यांची बिनविरोध निवड झाली.
          जय मल्हार पॅनेलचे अध्यक्ष दादाजी भागा अहिरे, साहेबराव देवरे,छबू भामरे,केदा बच्छाव, वसंत भाटेवाल, बाबुराव बच्छाव, विनोद ठाकरे, रामभाऊ अहिरे, उत्तम बच्छाव, गंगाबाई बच्छाव, संगिता सोनवणे आदी सदस्य उपस्थित होते.
          जितेंद्र अहिरे, मन्साराम जोंधळे, संदिप सुर्यवंशी, युवराज अहिरे, खंडू आढाव ,सुरेश निकम , सुभाष आढाव, विनायक अहिरे , पप्पू आहिरे, बंडू अहिरे, व गावातील ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
   निवडणूक अधिकारी म्हणून मा.सुजय पोटे यांनी कामकाज पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने