📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

डॉ. फरिदा शफिक यांच्या स्मरणार्थ जे ए टी महिला महाविद्यालयात शोकसभा

( मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या व्याख्यात्या डॉ. फरीदा शफिक यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. जे ए टी महाविद्यालयात त्यांनी प्रदीर्घ सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर देखील व्यवस्थापनाने त्यांना सन्मानाने विजिटिंग फॅकल्टी म्हणून नियुक्त केले होते. अतिशय मितभाषी, मृदु, नम्र स्वभावाच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला होता. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व्यवस्थापन आणि महाविद्यालयातर्फे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन निहाल अहमद अन्सारी यांनी डॉ. फरिदा शफिक यांच्या आकस्मित निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांनी डॉ. फरिदा शफिक यांच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वक्तशीरपणा चे आणि कार्याचे कौतुक केले. डॉ. फॅमिदा अन्सारी, प्रा. सुनेत्रा मेश्रामकर , प्रा.व्ही. के. पवार प्रा. पठाण, डॉ. पठाण, शेख अतिक या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले, आणि त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. डॉ. फरिदा शफिक यांच्या पश्चात त्यांचे पती, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करून शोक सभेची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने