देवळा - प्रशांत गिरासे
लोहणेर -वासोळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन धारक त्रस्त झाले. आहेत.वाहनधारकांना रात्रीच्या वेळेस खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. लोहोणेर हे व्यापार आणि राष्ट्रीयकृत बँकांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून निंबोळा, महालपाटणे,वासोळ ,वासोळपाडे ह्या गावांचा दररोजच लोहणेर गावाशी संपर्क येत असतो त्यातच शासकीय कामासाठी देवळा व सटाणा ह्या तालुक्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी ह्याच मार्गाने जावे लागत असल्याने ह्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी स्वरांना खड्डे टाळण्याचा नादात नेहमीच अपघात घडत असतात. ह्या रस्त्याने जातांना रस्त्यात खड्डा आहे कि खड्डयातच रस्ता आहे हेच समजत नाही