मालेगांव..
मालेगांव कॅम्प पोलीस हद्दीतील के.बी.एच. विद्यालया समोरील सोयगाव रोड वरील सत्यम व महावीर कॉम्प्लेक्स चोरट्यांचे माहेर घर झाले आहे. या दोन्ही कॉम्प्लेक्समधील पार्कीग मधुन वाहन चोरी, शिक्षकांच्या पतसंस्थेचे कार्यालय फोडणे व घरात घुसुन महिलेच्या दागीन्यांची चोरी हे त्याचे मुर्तीमंत उदाहरण आहे.
महावीर कॉम्प्लेक्स मध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा वेतनदार सह. पतसंस्थेचे प्रशासकीय कार्यालय आहे, संस्थेचे चेअरमन सतिष महाजन कार्यालयात कामानिमित्त आले असता त्यांनी बिल्डींगच्या पार्कीगमध्ये लावलेली त्यांची होन्डा शाईन मोटारसायकल चोरट्याने लॉक तोडुन चोरुन नेली, ही घटना सी.सी.टी.व्ही. मध्ये कैद झाली आहे. याचप्रकारे श्री. राजु पाटील यांची अॅक्टीवा, श्री. दुसाने यांची हिरो होन्डा, श्री. पाटील यांची स्प्लेंडर, श्री. शेखर आबा यांची स्प्लेंडर श्री. बापू बच्छाव यांची स्प्लेंडर या मोटारसायकलसह श्री. कापडणीस यांच्या घरी भर दुपारी महिलेच्या अंगावरील दागीने चोरुन नेले आहेत. तसे शिक्षक पतसंस्थेचे कार्यालयही चोरट्यांनी फोडले होते.
गेल्या आठवड्यात याच परिसरातील म.स.गा.महाविद्यालयाच्या वाहनतळावरून दाभाडी येथिल विद्यार्थ्यांची प्लॅटीना मोटारसायकल चोरट्यांनी चोरली होती, त्यांच्या मित्रांनी शोधमोहीम राबवली असता सटाणा नाका परिसरात एक युवक ती गाडी घेवून जात असतांना सापडला त्याला पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. गाड्या चोरणाऱ्यांमध्ये तरुण वर्गाची गँग कार्यरत असल्याचे दिसते.
गेल्या वर्ष भरापासुन मालेगांव हे देशातील वाहन चोरीच्या बाबतीत अग्रक्रमावर आले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा यांचा धाक नसल्याने वाहन चोरीसह बेशीस्त वाहतूक, अपघात यामुळे मालेगांवकर भयभीत झाले असुन पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अन्यथा जागोजागी धरणे आंदोलण छेडण्याचा इशारा महावीर व सत्यम कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी दिला आहे.